आबासाहेब काकडे विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आदिती विघ्ने, कार्तिक मुटकुळे आणि आरुषी भापकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : अहिल्यानगर जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मिक्स बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आबासाहेब काकडे विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कु. आदिती आजिनाथ विघ्ने, कार्तिक दत्तात्रय मुटकुळे आणि आरुषी सुरेश भापकर यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले. अहिल्यानगर येथील राष्ट्रीय पाठशाळा, माळीवाडा येथे १ नोव्हेंबर रोजी ही जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १५० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सेमी-कॉन्टॅक्ट आणि फुल-कॉन्टॅक्ट प्रकारातील सब-ज्युनियर, ज्युनियर व सीनियर (मुले व मुली) गटांतील खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय पाठशाळेचे बोडखे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नारायण संपत कराळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, सचिव हरी सानप, खजिनदार शशिकांत नवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून ओमकार भंडारी, कार्तिक काळे, सिद्धेश यादव आणि सुशांत मिसाळ यांनी काम पाहिले. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडावळे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ. शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, युवा नेते पृथ्वी भैया काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ यांनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Exit mobile version