श्री शिवशंकर विद्यालय, भरोसा येथे विद्यार्थ्यांना मोफत दीपावली अभ्यासमालेचे वाटप

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-मुख्याध्यापक संदीप वायाळ यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी स्तुत्य उपक्रम

चिखली (अंकुश पाटील) : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि दीपावलीच्या सुट्ट्यांचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा, या उद्देशाने श्री शिवशंकर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, भरोसा येथे विद्यार्थ्यांना मोफत दीपावली अभ्यासमालेचे वाटप करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप वायाळ यांनी स्वतः पुढाकार घेत इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दीपावली अभ्यासमाला उपलब्ध करून दिली. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या अभ्यासमालेचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या सुट्टीतही नियमित अभ्यास करावा, त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी वाढावी आणि शैक्षणिक प्रगती साधता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देणारा हा उपक्रम विद्यालयासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरत आहे. मुख्याध्यापक संदीप वायाळ यांच्या या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाचे पालक आणि शिक्षणप्रेमींकडून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयाने उचललेले हे पाऊल प्रेरणादायी ठरत आहे.

Share This Article
Exit mobile version