टेम्पो बारीला लावण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

editor 1 Min Read
1 Min Read

उदगीर (संगम पटवारी) –  येथील देगलूर राेडवर दाेघाजणांत  टेम्पो बारीला लावण्याच्या कारणावरून वाद होवून तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दगड, लोखंडी टॉमी व काठीचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोघा गटातील व्यक्ती जखमी झाले असून, उदगीर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देगलूर रोडवर दोन गटात हाणामारीची ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली आहे.  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देगलूर रोडवरील बालाजी टाईल्स गोडावूनच्या समोर अब्दुलगणी मैनोद्दीनसाब तांबोळी (वय 35 वर्ष) राहणार मुक्रमाबाद ता. मुखेड, जि. नांदेड व विकास शिवाजी जाधव राहणार बोरतळा तांडा या दोघात टेम्पो बारीला लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. हाणामारीत दगड, लोखंडी टॉमी व काठीचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोघा गटातील व्यक्ती जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील व्यक्तीनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी दोन्ही गटावर 9 सप्टेंबर रोजी रात्री गुरंन 414/2022कलम 327,324,323,504,34 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांच्याकडे देण्यात आला आहे.

Share This Article
Exit mobile version