आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील गणेश विसर्जन मिरवणुकांचे खास आकर्षण ठरला तो हरिनामाचा गजर,ढोल-ताशाचा दणदणाट आणि भक्तीमय जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यासाठी गणेश भक्तांनी आळंदी नगरपरिषदेने विकसित केलेल्या कृत्रिम गणेश विसर्जन केंद्रात ठिकठिकाणी मोठी गर्दी केली. आळंदी नगरपरिषदेने यावर्षी इंद्रायणी नदी घाट श्रींचे गणेश विसर्जन करण्यास पूर्णपणे बंद केला होता. इंद्रायणी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी दक्षता उपाययोजनेचा भाग म्हंणून नदी घाटाचे दुतर्फ़ा देखील मूर्ती विसर्जन केंद्र उभारल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. नदी घाटावर गणेश भक्तांनी नगरपरिषदेचे आवाहनाला प्रतिसाद देत हजारो मूर्ती दान करीत आळंदीतील नदीचे पावित्र्य जोपासण्यास सहकार्य केल्या बद्दल प्रशासनाने गणेश भक्त आणि नागरिकांचे आभार मानले.
आळंदी शहर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी ५ ठिकाणी केलेल्या मूर्ती दान स्वीकार केंद्रास प्रतिसाद देत आरती नांतर प्रतीकात्मक पाण्याचे हौद्यात श्रींचे विसर्जन करीत प्रशासनांकडे मूर्ती दान केल्या. यासाठी आळंदी नगरपरिषदेने शहरात ठिकठिकाणी मूर्ती दानस्वीकारण्यासाठी केंद्र उभारली होती. यावर्षीही भाविकां कडून गणेश मूर्ती दान घेत मागील वर्षीचा उच्चांक मोडत आणखी वाढविला. यावर्षी सुमारे हजारो गणेश मूर्ती दान घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. आळंदीत पारंपरिक ढोल-ताशा आणि शिस्तबद्ध, वाजत गाजत मिरवणुका आणि गुलाल उधळण टाळून यावर्षी ही पुष्प तसेच भंडाराची मुक्त उधळण करीत श्रीना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तिमय भावपूर्ण उत्साहात निरोप देण्यात आला. आकर्षक सजविलेले विविध रथ यातून श्रींचे लक्षवेधी सजलेली मूर्ती, विद्युत रोषणाई आणि मार्गावरील जल्लोष यामुळे मिरवणुकीस मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी राहिला. दुतर्फा भाविक, नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करीत श्रींचे दर्शन घेतले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकर व्हावे, याकरिता आळंदी पोलिस ठाण्याचे वतीने नियोजन करून मंडळ पदाधिकारी यांना आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी वरिष्ठांचे वेळोवेळी केलेल्या सूचना प्रमाणे पंचक्रोशीत नियोजन केले. यासाठी पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी मंडळाचे पदाधिकारी यांचेशी सुसंवाद ठेवला. करण्यात आले होते. यामुळे आळंदीतील प्रथाचे पालन करीत इंद्रायणी नदी घाटावर श्रीची आरती नंतर श्रीचे विसर्जन गणेश मूर्ती दान करीत झाले. भाविकांनी निर्माल्य कुंडात देत नदी प्रदूषण रोखण्याचा नागरिकांनी देखील प्रयत्न केला. यासाठी सर्वतोपरी मदत आळंदी नगरपरिषद आरोग्य सेवेने केली. विसर्जन मिरवणुकीत डीजेमुळे होणाऱ्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सवात स्वीकारले. या उपक्रमाचे आळंदीत स्वागत करण्यात आले. आळंदी परिसरातील विसर्जन मिरवणूकांचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्यासाठी पोलिस मित्र,नागरिक ,कार्यकर्ते यांनी मदत केली. भाविकांना पाणी वाटपाचा कार्यक्रम ही नगरप्रदक्षिणा मार्गवर नागरिकांनी केला.
अमरदिप तरुण मंडळाचे गणपती विसर्जन मंडळा समोरच करीत इतर मंडळांना आदर्शवत कार्य यावर्षी करण्यात आले. शहरात अमरदिप तरुण मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. मंडळाने विविध सामाजिक कार्यक्रम राबविले. शेवटच्या दिवशी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे महाप्रसाद, मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळाचे स्वागत करुन सन्मान करण्यात आला. गेली दहा दिवस सेवा करणाऱ्या आळंदी नगरपरिषदेच्या कर्मचारी व आळंदी पोलिस स्टेशनचे पोलिस आणि सामाजिक काम करणाऱ्या सेवकांचे मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेच्या सूचना प्रमाणे इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या आवाहना प्रमाणे मंडळाने गणपतीचे विसर्जन हे मंडळाच्या समोर फुलांनी सजवलेल्या हौदात केले. मंडळाच्या सर्व सभासदांनी गेली दहा दिवस मेहनत घेऊन गणेशोत्सव साजरा केला. येथील जय गणेश प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, शिवस्मृती प्रतिष्ठान,अखिल भाजी मंडई मंडळ, हनुमान मित्र मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, श्री दत्त नगर प्रतिष्ठान, न्यू दत्तनगर मित्र मंडळ, दत्तनगर प्रतिष्ठान, पद्मावती मित्र मंडळ, नवशिवशक्ती मित्र मंडळ, राजे ग्रुप, रोकडोबा महाराज प्रतिष्ठान, सुवर्णयुग मित्र मंडळ, हर हर महादेव मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ, आदी सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी उत्सव साजरा केला. यावर्षी ही गणेश विसर्जन शांततेत झाले. गणपतींचे विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न घडता दिमाखात पार पडले आहे.
यावर्षी गुलाल न वापरता भंडाराची मुक्त उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी,ढोल-ताशाचा गजरात, हरीनाम जय घोषात आळंदी खेड आणि आळंदी हवेली या भागातील गणेश विसर्जन मूर्ती केंद्रावर करण्यात आले. आळंदी पालिकेने निर्माल्यासाठी घंटागाड्या सेवा रुजू केली. गणेशोत्सव या आनंदोत्सवाची सांगता श्रीचे विसर्जनानंतर महाप्रसाद वाटपाने झाली. आळंदीत शांतता सुव्यवस्थेसाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, शहाजी पवार, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी मूर्ती दान उपक्रमास गती दिली. आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी, आपत्ती निवारण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा कार्यरत राहिल्या.
गणेशभक्तांसह आळंदीकरांचे आभार : मुख्याधिकारी जाधव
आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यास नगरपरिषदेने यावर्षीही गणेश मूर्ती दान उपक्रम राबविला.यासाठी जनजागृती केली.नगरपरिषदेने केलेले आवाहन यास सार्वजनिक गणेश मंडळे आणि पंचक्रोशीतील नागरिक यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावर्षी हजारो श्रींचे मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या. यामुळे या लोकाभिमुख उपक्रमास आळंदीकर नागरिकांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याने नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. यावर्षी मूर्तीदान आणि निर्माल्य संकलन मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला. निर्माल्यादी वस्तू इंद्रायणी नदी घाटावर घंटा गाडीतून जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरानं आळंदीत विसर्जन मिरवणुकीत रंगात आणली. जय गणेश प्रतिष्ठान तर्फे भारुड सादर करीत जनजागृती करण्यात आली. एकलव्य प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, एकत्व प्रतिष्ठान, न्यु. दत्तनगर ग्रुप, धर्मराज ग्रुप, श्री.दत्तनगर प्रतिष्ठान, सुवर्णयुग मित्र मंडळ, गर्जना पसायदान मित्र मंडळ आदी मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. चरित्ररथ लक्षवेधी ठरले. विसर्जन मिरवणूक उत्साही शांततेत झाली. आळंदी व दिघी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

