-हरिनामाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय; विद्यार्थ्यांना नैतिक संस्कार व मूल्याधिष्ठित शिक्षणाची जोड
पुणे (अर्जुन मेदनकर) : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन शाळांमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या संस्कारक्षम उपक्रमाचा हरिनामाच्या जयघोषात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत नैतिक मूल्ये आणि संस्कारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- वै. आबा रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा क्रमांक १०४, भूमकर चौक, वाकड, पिंपरी-चिंचवड.
- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बा. रा. घोलप माध्यमिक विद्यालय, नवी सांगवी, पिंपरी-चिंचवड.
- नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शितोळेनगर, नवी सांगवी, पिंपरी-चिंचवड.
आधुनिक काळात नैतिक संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमाचे महत्त्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विशद केले. शाळांच्या व्यवस्थापन समित्या, संस्थांचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कारांची जोड देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

