- उद्या रक्षाविसर्जन कार्यक्रम
देऊळगाव घुबे (प्रतिनिधी) : चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील रहिवासी तथा शेतकरी जनार्दन रंगनाथ सांगळे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने मिसाळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. ‘चांगल्या माणसांची उणीव कधीच भरून निघत नाही, त्यांची आठवण सदैव मनात राहते,’ अशा शब्दांत नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली.
स्व. जनार्दन सांगळे यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम उद्या, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मिसळवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात मुले संतोष जनार्दन सांगळे व नारायण जनार्दन सांगळे, एक मुलगी आणि पत्नी असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

