रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या देऊळगाव राजा येथे ‘भीक मांगो’ आंदोलन

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचे आवाहन

बिबी (ऋषी दंदाले) : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी आणि दुष्काळासाठी दिली जाणारी तुटपुंजी मदत याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राज्यभर विविध आंदोलने केली आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी ११ वाजता देऊळगाव राजा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ‘भीक मांगो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आंदोलन देऊळगाव राजा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या आंदोलनातून जमा होणारी भीक राज्य सरकारला दान करून शेतकरी सरकारविरोधातील आपला संताप व्यक्त करणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version