वाळूमाफिये चक्क प्रशासनाच्या जीवावर उठले; शिवीगाळ करून तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी

editor 2 Min Read
2 Min Read

– एखाद्या दिवशी तुझ्या अंगावरूनच वाहन घालतो, वाळूतस्कराची धमकी

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – नांदुरा- विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या वाळू माफिया ट्रॅक्टर चालकाला शासकीय कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याने रॉयल्टी मागितली असता त्याने तलाठ्याला लोटपाट करीत वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १३जूनच्या सकाळी ८.३० वाजेदरम्यान ग्राम धानोरा खुर्द शिवारातील ज्ञानगंगा नदीपात्रात घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की पटवारी श्रीकृष्ण नारायण सोळंके वय ३५वर्षे रा नालंदा नगर यांनी नांदुरा पोस्टेला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते मौजे धानोरा खुर्द येथे तलाठी म्हणून सन २०१३पासून कार्यरत आहे १३जून रोजी सकाळी ८.३०वाजेदरम्यान श्रीकृष्ण धनसिंग डाबेराव यांना सोबत घेऊन ज्ञानगंगा नदी पात्रात अचानक पणे भेट दिली असता त्या ठिकाणी आरोपी रविंद्र उर्फ बाळू मनोहर साबे रा धानोरा खुर्द याच्या मालकीचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर दिसून आले तसेच ते सुद्धा उपस्थित होते वाहनाला क्रमांक सुद्धा नव्हता त्यावेळी त्याला वाळूची रॉयल्टी आहे का अशी विचारणा केली असता माझ्या जवळ रॉयल्टी नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे जोरात ओरडून माझ्याशी वादविवाद करीत मला लोटपाट करून एखाद्या दिवशी तुझ्या अंगावरून वाहन नेऊन तुला मारुन टाकील अशी धमकी दिली त्यावेळी त्याला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घ्या असे म्हटले असता आरोपी ट्रॅक्टर घेऊन नदीपात्रातून पळून गेला याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी आरोपी रविंद्र ऊर्फ बाळू मनोहर साबे याच्याविरुद्ध सरकारी कर्तव्यावरील कर्मचाऱ्याला लोटपाट करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३,१८९,५०६अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिरगे हे करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version