दुर्गम भागातील अंगणवाडी सेविकांद्वारे गणेश विसर्जनात बालविवाहाविरुद्ध समुपदेशन

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील उमरीमाळ पाडा व शिरखेड पाडा येथे गणश विसर्जन मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांनी एक आदर्श उपक्रम राबविला आहे.  या दोन्ही पाड्यावरच्या अंगणवाडी अंतर्गत येणाऱ्या गावकरी आणि महिलांनी बालविवाह विरोधात शपथ घेतली आहे.  गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात दहा हजारांहुन अधिक बालविवाह झाले असतांनाच ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी बालविवाहा विरोधात घेतलेली शपथ खरया अर्थाने कौतुकास्पद उपक्रम म्हणावा लागेल.  या शपथविधीनंतर पारंपारीक नृत्यावर गणरायाला ग्रामस्थांनी निरोप देण्यात आला आहे.

Share This Article
Exit mobile version