मुकुल वासनिकांच्या पुनर्नियुक्तीने लोणारमध्ये काँग्रेसचा जल्लोष

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्तीचे स्वागत; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आनंदोत्सव

लोणार (वाजिद खान) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा राज्यसभेचे खासदार मुकुलजी वासनिक यांची संसदीय स्थायी समिती (शिक्षण, महिला, बाल, युवा व क्रीडा) यांच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मुकुलजी वासनिक यांच्या पुनर्नियुक्तीचे स्वागत केले.

मुकुलजी वासनिक यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वातून शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच युवा व क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषयांना संसदीय पातळीवर अधिक प्रभावीपणे दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अश्रू फुके यांनी केले होते.

कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलीया, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारी, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष नगर परिषद आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, ज्ञानेश्वर चिभडे, आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी मुनाफ, साहेबराव पवार, संतोष मापारी, शाम राऊत, एजाज खान, नगरसेवक जमील कुरेशी, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, प्रा. विठ्ठल भानुसे, गजानन मापारी, अमोल सोनुने, श्रीकृष्ण बाजाड, शेख अफसर शेख तुराब, शुभम चाटे, भवानी मापारी, सागर मापारी, आप्पा शिंदे, मोहसीन शहा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुकुलजी वासनिक यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत घोषणाबाजी व जल्लोष केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share This Article
Exit mobile version