चिखली ग्रामीण रुग्णालयात सिझरची सुविधा करा : भाई विजयकांत गवई

editor 2 Min Read
2 Min Read

चिखली (तालुका प्रतिनिधी) – येथील ग्रामीण रुग्णालयात गोरगरिब महिलांना अवघड व जीवावर बेतणार्‍या बाळंतपणात सिझर करण्याची सोय नसल्याने, येथील डॉक्टर त्यांना ऐनवेळी बुलढाणा येथे रेफर करतात. त्यामुळे अवघडलेल्या महिलेच्या जीवावर बेतू शकते. तेव्हा, याच रुग्णालयात तातडीने सिझरची सोय करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेच्यावतीने देण्यात आलेला आहे.

चिखली ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भवती महिलांची सिजर करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. त्याबाबत चिखली ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना रिपब्लिकन सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले व डॉक्टरांनी पेशंटला तपासणी केली की डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांना म्हणतात की, दवाखान्यात सिजर करण्यासाठी कोणतेच प्रकारचे साहित्य नाही व पेशंटची हालत खूप खराब आणि रक्तही कमी आहे, त्यांना ताबडतोब बुलढाणा येथे पाठवले पाहिजे. गर्भवती महिलांना चिखली ग्रामीण रुग्णालयामधून बुलढाणा जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते आणि पेशंट व पेशंटचे नातेवाईक बुलढाणा न जाता चिखलीमध्येच खाजगी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांचा सिजर करून घेतात. सिजर करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये ३० या ४० हजार रुपये या गोरगरिबांना त्या ठिकाणी द्यावा लागते. गोरगरिबांचे ग्रामीण रुग्णालय असतानाही पेशंटचे हाल होत असतात व सरकारी दवाखान्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे सुविधा गर्भवती महिलांना मिळत नाही व गर्भवती महिलांना सिजर करण्यासाठी चिखली ग्रामीण रुग्णालयामध्ये ब्लड बँकची आवश्यकता आहे, ती सुविधाही ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात यावी. चिखली ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांचे व डॉक्टरांचे रुग्णालयामध्ये दुर्लक्ष दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी यांनी ताबडतोब गर्भवती महिलांसाठी सिजर करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सुविधा करण्यात यावी, व गोरगरिबांची लूट थांबवावी. खाजगी हॉस्पिटलपासून गोरगरिबांना न्याय देण्यात यावा, असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, ऋषिकेश हिवाळे, सतीश इंगळे, अरुण जाधव, पिराजीभाऊ यांची उपस्थिती होती. निवेदनातील मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

Share This Article
Exit mobile version