-अमरावती विभागीय स्पर्धेसाठी खुशी मोरे, समीक्षा दिलवाले व उत्कर्षा चव्हाण यांची निवड
चिखली (अंकुश पाटील) : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग विद्यालय, असोला बुद्रुक येथील विद्यार्थिनींनी थाग मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात चमकदार यश संपादन केले आहे. विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर खुशी मोरे, समीक्षा दिलवाले आणि उत्कर्षा चव्हाण या विद्यार्थिनींची अमरावती विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थिनींनी आपल्या कौशल्याचे आणि मेहनतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ही निवड मिळवली. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग विद्यालय, असोला बुद्रुकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत या विद्यार्थिनी आपल्या खेळाचे कौशल्य सादर करणार आहेत. या यशासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक तसेच विद्यालयाचे अध्यक्ष श्री. बंगाळे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थिनींच्या या निवडीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून अमरावती विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. थाग मार्शल आर्टमध्ये विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल खुशी मोरे, समीक्षा दिलवाले आणि उत्कर्षा चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

