-जिल्हाध्यक्ष मुकेश तायडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार
लोणार (वाजिद खान) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अपंग सेलच्या लोणार तालुका अध्यक्षपदी शेख अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मुकेश तायडे यांच्या हस्ते शेख अहमद यांना प्रदान करण्यात आले.
शेख अहमद यांची सामाजिक व पक्षीय कार्यातील सक्रियता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जामा मस्जिद चौक येथे यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी होते. प्रमुख अतिथी म्हणून लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, आरोग्य सभापती अब्दुल उबेद, माजी नगरसेवक अंबादास भाऊ इंगळे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ सफी मुल्लाजी, शेख महबूब शेख बाब मिया, शेख शरीफ शेख नवाज, शेख नाशिर शेख फारूक, शेख रफीक शेख शकील, शेख हुसेन, अख्तर मुलाजी, शेख आरेफ शेख कौसर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेख अहमद यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून लोणार तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.