- महाराष्ट्रातील ७५ टक्के भागात दुष्काळ; बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा समावेश
- शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवसुलीस स्थगिती, वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्क माफी आणि चारा छावण्यांसह विविध उपाययोजना लागू
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे/केयूर सांगळे) : राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात असतानाच, निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पावसाच्या दीर्घ दडीमुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या या २६५ तालुक्यांचा यामध्ये समावेश असून, यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात तीव्र दुष्काळाची दाहकता सहन करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याप्रश्नी ब्रेकिंग महाराष्ट्रनेच राज्यभर सर्वप्रथम आवाज उठविला होता.
पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; जीपीएस तंत्रज्ञानाचा होणार वापर
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आगामी ५ ऑक्टोबरपासून पिकांच्या पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस (GPS) लोकेशन संकलित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
राज्य सरकारकडून विविध उपाययोजना
राज्य सरकारने दुष्काळी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक सहकार्य देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक व महसुली दिलासा
- जमीन महसुलात पूर्ण सूट.
- शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस तात्काळ स्थगिती.
- सर्व प्रकारच्या पीक कर्जांचे पुनर्गठन करण्यात येणार.
वीज आणि ऊर्जा क्षेत्रातील सवलती
- कृषीपंपांच्या चालू वीजबिलात विशेष सवलत. ७.५ अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) क्षमतेपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आधीच माफ असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही सवलत देण्यात येणार आहे.
- टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कोणत्याही शेतकऱ्याच्या कृषीपंपाची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.
विद्यार्थी, शेतमजूर आणि पशुधनासाठी उपाययोजना
- दुष्काळग्रस्त भागातील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार.
- शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार.
- जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची योग्य व्यवस्था करण्यात येणार. आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्यात येणार.
पाणीपुरवठा व रोजगाराच्या कामांना गती
- आवश्यक त्या सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार.
- रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) नियमांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येणार.
- जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन पूर्वीच्या आदेशानुसार सुरू ठेवण्यात येणार.
दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांची जिल्हानिहाय संपूर्ण यादी
राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये शासनाने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांची जिल्हानिहाय सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:
१. नाशिक विभाग (उत्तर महाराष्ट्र)
- नाशिक: मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा.
- धुळे: धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर.
- जळगाव: एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.
- नंदूरबार: अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी.
- अहिल्यानगर (अहमदनगर): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.
२. पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र)
- पुणे: भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर.
- सोलापूर: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
- सांगली: मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ.
- सातारा: सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.
- कोल्हापूर: पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.
३. कोकण विभाग
- रत्नागिरी: श्रीवर्धन, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
४. छत्रपती संभाजीनगर विभाग (मराठवाडा)
- छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.
- जालना: बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद.
- बीड: बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.
- लातूर: लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट.
- धाराशिव: धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा.
- नांदेड: नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव.
- परभणी: पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.
- हिंगोली: हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.
५. अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ)
- बुलढाणा: जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा. (बुलढाण्यातील सर्व १३ तालुके)
- अमरावती: अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.
- अकोला: अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.
- वाशीम: वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा.
- यवतमाळ: यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.
६. नागपूर विभाग (पूर्व विदर्भ)
- वर्धा: वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी.
- नागपूर: नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.
- भंडारा: भंडारा, पवनी, लाखंदूर.
- गोंदिया: तिरोडा.
- चंद्रपूर: चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा.
- गडचिरोली: गडचिरोली, चामोर्शी.
दीड महिन्यापासून पाऊस गायब; सोयाबीनला दाणा नाही, कपाशीला बोंड नाही; बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी सावट!

