भारताला विश्वगुरू म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे : विजयराज शिंदे

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : भारत देशाला विश्वगुरू म्हणून ओळख मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्ती जोपासणारे आहे. गेल्या १२ वर्षांत कोणत्याही प्रकारचा डाग लागू न देता त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस साजरा करताना समाजात जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करण्याचा उपक्रम भाजपच्या वतीने राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी साखरखेर्डा येथे आयोजित कार्यक्रमात केले.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मान देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. साखरखेर्डा परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी कोरोना काळातही आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, मुलांच्या जन्मनोंदणीपासून ते बीएलओंसोबत माहिती संकलन करण्यापर्यंतची विविध कामे त्यांनी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले.

यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविताताई पाटील, प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्डे, निताताई देशपांडे, पूजा रिंढे, उपसरपंच अंकिताताई राजपूत, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव परवेझ भाई, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, दीपक चिंचोले, शिवाजी वाघ, अंकुर देशपांडे, गोपाल पाझडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डिगांबर गाडे यांच्या ‘ओंजळ भरली मोत्याने’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डिगांबर गाडे यांनी केले, तर आभार संतोष दसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दीपक रिंढे, भाजप युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पऱ्हाड, संग्रामसिंह राजपूत, शिराळे व बंगाळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share This Article
Exit mobile version