-धार्मिक प्रकोष्ठाची जबाबदारी; धर्मरक्षा, गोरक्षा व देशहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) : अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. वैभवराज रौंदल यांच्या आदेशान्वये अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष – धार्मिक प्रकोष्ठ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे की, अर्जुन मेदनकर हे यापुढे पुणे जिल्ह्यात धर्मरक्षा, गोरक्षा व देशहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेतील. त्यांच्या नियुक्तीमुळे हिंदू महासभेच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल अर्जुन मेदनकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.