-तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; श्री. गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक
चिखली (अंकुश पाटील) : शहरातील गजानन नगर येथील रहिवासी यश संजय शेळके याची जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यश संजय शेळके हा जाफराबाद तालुक्यातील जानेफळ येथील श्री. गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, तो इयत्ता बारावी (सायन्स) मध्ये शिक्षण घेत आहे. नुकत्याच जाफराबाद तालुक्यातील शिपोरा येथील ज्ञानसागर महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत यश शेळकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याची जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या निवडीचे श्रेय यश शेळके याने संस्थाध्यक्ष पी. एस. मुरकुटे, जीवन मुरकुटे, महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाबराव शिनगारे, क्रीडाशिक्षक आर. आर. पंडित, अमोल गायकवाड, मस्के सर, वडील संजय शेळके तसेच आई सौ. कविता ताई शेळके यांना दिले आहे. यश शेळकेच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

