– शिक्षण, पूजा-विधी, भजन-गायन आणि ज्योतिषशास्त्रात होते विशेष योगदान; मिसाळवाडीकरांवर शोककळा
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : मिसाळवाडी येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक गणपत तोताराम मिसाळ गुरुजी यांचे सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मिसाळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
गावातील धार्मिक, सामाजिक तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना मिसाळवाडीकरांतून व्यक्त होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा होत असतानाच गावातील आपला लाडका माणूस कायमचा सोडून गेल्याने मिसाळवाडी ग्रामस्थ भावुक झाले आहेत. गणपत मिसाळ गुरुजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता मिसाळवाडी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात रामेश्वर गणपत मिसाळ, सुनील गणपत मिसाळ व मिसाळ परिवार असा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी मिसाळवाडीकरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेतकरी नेते रविकांत तुपकर, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पुरूषोत्तम सांगळे, सरपंच बाळू पाटील, सरपंच सतिश भुतेकर, ज्येष्ठ नेते विकास मिसाळ, उपसरपंच हनुमान मिसाळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

