अपघाती निधन झालेल्या शिवाजी सुरडकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-वाडी ब्रह्मपुरी येथे श्री. अंकुशराव पाटील यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय; मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात

चिखली (महेंद्र हिवाळे) : वाडी ब्रह्मपुरी येथील रहिवासी शिवाजी सुरडकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबावर आलेल्या दुःखद प्रसंगी त्यांच्या विधवा पत्नी जिजाबाई सुरडकर यांची भेट घेऊन श्री. अंकुशराव पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.

यावेळी सुरडकर कुटुंबाच्या अडचणींची जाणीव ठेवत त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. संकटाच्या काळात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये, या सामाजिक भावनेतून ही मदत करण्यात आली. या प्रसंगी सुनील वानखेडे सर, वीरेंद्र वानखेडे, रामदास पाटील, सुभाष वानखेडे, निळकंठ वानखेडे, दिलीपराव वानखेडे, भगवानराव काळे, छगनराव वानखेडे तसेच वाडी ब्रह्मपुरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दुःखाच्या प्रसंगी केवळ सांत्वन न करता गरजू कुटुंबाच्या भविष्यासाठी आधार देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या मदतीतून अधोरेखित झाले.

Share This Article
Exit mobile version