कोल्हापूर (दिलीप प्रभावळे) – वडणगे (ता. करवीर) येथे विधवा महिलांना सन्मानपूर्वक स्थान देणारा ‘हेरवाड पॅटर्न’ संपूर्ण राज्यभर राबविला जात असताना वडणगेकराणी याचे अनुकरण करून श्री. विजय हौसिंग सोसायटी येथील संयुक्त तरुण मंडळाच्यावतीने परिसरातील विधवा महिलांना मान-सन्मान देऊन त्यांच्या हस्ते श्री गणेश आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या आरतीस पुनम पंडित कचरे, मालुबाई पाटील, छाया पाटील, अनिता चौगुले, वैशाली बराले, कल्पना सुतार, सुवर्णा टिटवे, शारदा टिटवे या महिला सहभागी झाल्या होत्या.

