चिखलीत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-१३ सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

चिखली (राजेंद्र घुबे) : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार, १३ सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणे हे मानवतेच्या नात्याने आपले परम कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी या रक्तदान शिबिरात स्वतः सहभागी होऊन इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वांत महान दान मानले जाते. रक्तदानामुळे रक्ताची गरज असलेल्या व्यक्तीला मदत होतेच, तसेच रक्तदान करणाऱ्यालाही अनेक बाबतींत फायदे होतात. रक्तदानाच्या प्रक्रियेदरम्यान रक्ताची नियमित तपासणी होते तसेच रक्तगटाची माहितीही मिळते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक विचारधारा असून, या माध्यमातून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यांसारखे विविध जनहिताचे उपक्रम राबविले जातात. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देशभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तसंकलन केले जाते. जनहितार्थ अशा विविध उपक्रमांचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने सातत्याने करण्यात येते. या भव्य रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळ, शाखा चिखलीच्या वतीने जिल्हा संयोजक शालिकराम चवरे गुरुजी यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version