विद्युत शॉक लागून शेतकरी जागीच ठार

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा – (जिल्हा प्रतिनिधी) – शेतात काम करीत असताना विजेचा शॉक लागून 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ही धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील हिरडव येथे उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, लोणार तालुक्यातील हिरडव येथील महादेव रामभाऊ मुंडे वय 45 जे 14 जून रोजी भाजीपाल्याच्या शेतात काम करीत असताना विहिरीजवळ विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांना जबर विद्युत शॉक लागला त्यामुळे ते खाली कोसळले. व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरण व पोलीस कर्मचऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवि ण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास लोणार पोलीस करीत आहे.

Share This Article
Exit mobile version