प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा राऊत; युवा आघाडीची धुरा तानाजी पैठणे यांच्याकडे

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-महिला कार्यकारिणी व युवा आघाडीची जिल्हास्तरीय कार्यकारिणी जाहीर; सुषमा राऊत यांची चौथ्यांदा निवड

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बैठकीत महिला कार्यकारिणी आणि युवा आघाडीची घोषणा नुकतीच जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी केली. महिला जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा पत्रकार सुषमा राऊत यांची निवड करण्यात आली असून, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी पैठणे यांची निवड करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक नुकतीच पार पडली. कार्यकारिणीचा विस्तार करण्यासाठी महिला आघाडी व युवा आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा राऊत यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली, तर जिल्हा उपाध्यक्षपदी अश्विनीताई क्षीरसागर यांचे नाव जाहीर करण्यात आले. सुषमा राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी शेगाव येथे राज्यस्तरीय वधू-वर मेळावा घेऊन अनेक रेशीमगाठी जुळविल्या आहेत. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रांतिक तैलिक महासभेची भूमिका मांडत तेली समाजाला एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

नुकतीच त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केले आहे. उच्चशिक्षित असल्याने तसेच प्रबोधन करण्याची हातोटी असल्यामुळे त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी म्हणून त्या दैनिक देशोन्नतीमध्ये कित्येक वर्षांपासून निर्भीडपणे काम करीत आहेत. महिला जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळाले आहे. महिला जिल्हा उपाध्यक्षपदी अश्विनीताई क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रगल्भ वक्तृत्व महिलांना संघटित करण्यासाठी सहकार्यकारक ठरणार आहे. युवा आघाडीची घोषणा करताना बुलढाणा जवळील कोलवड येथील धडाडीचे कार्यकर्ते तानाजी रामदास पैठणे यांची युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version