एकाच परिवारातील दोन आधारवड कोसळले; देशसेवेत कर्तव्यावर असलेले सुभेदार पुत्र वडिलांच्या अखेरच्या निरोपापासून दूर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-चुलते-पुतण्यांचा एकत्र सावडण्याचा विधी उद्या सकाळी ९ वाजता

साखरखेर्डा (वार्ताहर) : पळसखेड चक्का, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथील स्वर्गीय कारभारी मुकुंदराव मुंढे काका, वय ८३, आणि स्वर्गीय प्रल्हाद नारायण मुंढे, वय ७२, या चुलते-पुतण्यांच्या निधनाने मुंढे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर शेतीशी नाळ जोडून कष्टाचे जीवन जगणाऱ्या या दोन्ही शेतकरी व्यक्तिमत्त्वांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्वर्गीय कारभारी मुकुंदराव मुंढे यांचा अंत्यविधी दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला, तर स्वर्गीय प्रल्हाद नारायण मुंढे यांचा अंत्यविधी ९ सप्टेंबर रोजी पार पडला. अवघ्या दोन दिवसांत कुटुंबातील दोन आधारवड हरपल्याने दोन्ही परिवारांवर दुःखाची छाया पसरली आहे. कारभारी मुंढे यांचे पुत्र नंदकिशोर कारभारी मुंढे हे स्वतः शेतकरी असून, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करतात. प्रल्हाद नारायण मुंढे हे माजी सावखेड तेजन ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते. शेती व शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे पुत्र अनिल मुंढे हे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. कै. प्रल्हाद मुंढे यांचे पुत्र नरेंद्र मुंढे हे भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल येथे सुभेदार पदावर कार्यरत असून देशसेवा बजावत आहेत. वडिलांचे निधन झाले असताना अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना उपस्थित राहता आले नाही. ही पोकळी त्यांच्या मनात कायम राहील. मात्र, ‘मातृभूमीची सेवा प्रथम’ हे ब्रीदवाक्य त्यांनी जोपासले. देशाच्या सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या या सुभेदार पुत्रासाठी वडिलांच्या अखेरच्या निरोपापासून दूर राहण्याचा प्रसंग अत्यंत वेदनादायी ठरला आहे. एका पाठोपाठ काका आणि पुतण्याच्या निधनाने मुंढे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच ठिकाणी, एकाच वेळी सावडण्याचा कार्यक्रम

काका आणि पुतणे कारभारी मुंढे आणि स्वर्गीय प्रल्हाद नारायण मुंढे या चुलते-पुतण्यांचा सावडण्याचा कार्यक्रम एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

Share This Article
Exit mobile version