-राज्यस्तरीय दक्षता पथकाचा सर्जिकल स्ट्राईक; अवैध बायोडिझेल साठ्यासह तब्बल २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त
साखरखेर्डा (सुरेश हुसे) : राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध बायोडिझेल साठ्यावर कारवाई करत तब्बल २१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई दुसरबीड आणि मेहकर येथील पेट्रोल पंपांवर करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध बायोडिझेल वापराचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक राजेश सोरते, अरुण काते, विकास नागदिवे, पवन कुंभले, रविंद्र राठोड, राजीव भेले, देवानंद थोरवे, रामराजे भोसले, दिपेंद्र परूळेकर, अमोल बुरटे, चंद्रकांत कांबळे, राहूल इंगळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नहुशकुमार बोरोडे, शुभम फाले, पुरवठा निरीक्षक विवेक जगताप, सुनील झाल्टे आणि गोदाम लिपिक विशाल लोखंडे सहभागी होते. अशा प्रकारच्या अवैध इंधन आणि गॅस तस्करांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांनी दिला आहे.


