– रायपूर पोलिसांची सातगाव भुसारी येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान धडक कारवाई!
– सावरगाव डुकरे येथील तरुणाकडून तलवार जप्त; सण-उत्सवांच्या काळात रायपूर पोलिस ‘ॲक्शन मोडवर’!
चिखली (महेंद्र हिवाळे) : सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या तलवार बाळगून फिरणाऱ्या एका तरुणावर रायपूर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीन दिगंबर डुकरे (वय वर्ष मानार, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई रविवारी (७ सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ग्राम सातगाव भुसारी येथे करण्यात आली.
या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक (ठाणेदार) निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप पडघान, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष काकडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर व चालक पोलीस हवालदार लिंबाजी राठोड यांच्या पथकाने केली. पोलीस प्रशासनाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम उघडली आहे.

