-वेदमंत्रघोष व हरिनाम गजरात धार्मिक उपक्रम; इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता व सामाजिक उपक्रमांचे आयोजन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आणि आळंदी देवस्थानच्या वतीने वेदमंत्रघोष व हरिनाम गजरात उत्साहात इंद्रायणी आरती झाली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. सामाजिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. आळंदी देवस्थानच्या वतीने इंद्रायणी आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. धार्मिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती करण्यात आली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

