-धानोरे जिल्हा परिषद शाळेचे कौतुक; १२०० शिक्षकांमधून ४५ शिक्षकांची निवड
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे जिल्हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिंगापूर येथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धती पुणे जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यासाठी सुरू केलेल्या ‘ग्लोबल गुरुजी’ पुरस्कारासाठी बाराशे शिक्षकांमधून निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवड झालेल्या ४५ शिक्षकांमध्ये पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे येथील आदर्श शिक्षिका अनिता शरद परदेशी यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पुणे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे, शाळा व्यवस्थापन समिती धानोरे, ग्रामपंचायत धानोरे, विद्यार्…

