आळंदी दुराफे विद्यालयात शिक्षकांचा सन्मान

editor 5 Min Read
5 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारताचे माजी राष्ट्रपती, उत्कृष्ट शिक्षक, विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तीर्थक्षेत्र आळंदीतील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे प्रशालेसह यातील पंचक्रोशीतील विविध शाळांत शिक्षक दिन विविध उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सेवाभावी संस्थानचे वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेत सर्व शालेय कामकाज शालेय मुलांनी सांभाळून शिक्षक दिन दुराफे विद्यालयात साजरा करण्यात आला.

दुराफे विद्यालयात श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंत संघर्ष सेना, आळंदी जनहित फाउंडेशन यांच्या वतीने शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सार्थ पसायदान पुस्तक, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला. प्रारंभ मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून आणि संत ज्ञानेश्वर महाराज , माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत झाला. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर होते. या प्रसंगी व्यासपीठावर विश्वस्त मुक्ताताई शिरोळे, पर्यवेक्षक मोहन पवळे, उपमुख्याध्यापक तात्या गावडे, संयोजक आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, ध्यास फाउंडेशनचे विश्वस्त गणेश गरुड, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, पोलीस वेलफेरा असोशिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव, स्वकुळ साळी ज्ञातीगृहाचे खजिनदार मनोहर दिवाणे, एल्गार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, इंडिया नाऊचे चीफ ब्युरो अनिल जोगदंड, सदाशिव साखरे, एमपीसीचे डी.के कुऱ्हाडे, श्रीमती ज्योती वाघमारे, अर्चना माने, दीपाली थोरात, संपत सांडभोर, समाधान मादक, सोनाली कुऱ्हाडे, वर्षा भालेराव, प्रज्ञा गायकवाड, सविता जाधव, सुनीता ढोले, भाग्यश्री मोकाशी, मोहन तोडकर, द्वारका चव्हाण आदींसह शालेय शिक्षकवृद,कर्मचारी,शालेय मुले उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शनकरताना संस्था चालक मुक्ताताई शिरोळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत, शिक्षकांना मार्गदशन केले. त्या म्हणाल्या, शाळेची खडतर वाटचाल झाली आहे. या प्रशालेच्या जडणघडणनीत स्व.तुकारामशेठ विठ्ठलराव दुराफे यांचे मोठे योगदान आहे. समाजात केवळ सल्ले, सूचना देणारे खूप झाले आहेत. प्रत्येक्ष सहकार्य आणि योगदान देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. चांगल्या मार्गावर घेऊन जाणारी व्यक्तिमत्व निर्माण होण्याची गरज आहे. योग्य मार्गदर्शन कसे मिळेल, चांगला माणूस कसा घडेल हे शिकविणे महत्त्वाचे आहे. येथून बाहेर जाणारा विद्यार्थी चांगला माणूस कसा घडेल यासाठी प्रयत्न झाले तरी खूप होईल. माणूस घडविण्याच्या कार्यास शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. जन्मापासून शिक्षणाचा सुरु झालेला प्रवास अखंड सुरूच राहतो. प्रत्यके वळणावर गुरुचे फार महत्त्व आहे. प्रथम आई वडील, त्या नंतर शालेय जीवनात शिक्षक गुरु यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. यावेळी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, यशवंत संघाशी सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, मनोहर दिवाणे, ज्ञानेश्वर रायकर, शिक्षक,शालेय मुले यांनी मनोगते व्यक्त करीत शिक्षण प्रति आदर व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीमती व्ही.व्ही. पारधी यांनी केले. स्वागत अतुल पवार यांनी केले. सूत्रसंचालन कावेरी देवकर यांनी केले.  आभार कविता दोंद यांनी मानले.


ध्यास प्रशालेत शिक्षक दिन साजरा

येथील ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर विभागांत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी प्रतिमा पूजन करून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक – शिक्षक सर्वांना विद्यार्थ्यां समवेत भेटवस्तू, श्रीफळ देऊन सन्मानित करून कार्याचा गौरव झाला. प्रशालेतील विद्यार्थिनी श्रेया जंगले व जानवी तांबिले यांनी इंग्रजी व हिंदी मधून मनोगत शब्दबद्ध केले. प्रशालेतील शिक्षिका आरती कुलकर्णी यांनी शिक्षक हा विद्येचा सागर आहे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आभार उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी मानले. सूत्रसंचालन दिक्षा बानाटे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरीवर शिक्षकदिन साजरा

येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे शिक्षक दिन सोहळा हा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक स्थळी जाऊन साजरा केला जातो. यावर्षी शिक्षक दिन छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभुमी किल्ले शिवनेरी गडावर साजरा झाला. किल्ले शिवनेरी गडावरील शिवकुंज सभागृहात शिक्षकांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती भेट देत सत्कार झाला. याप्रसंगी ह. भ. प. रामेश्वर महाराज शास्त्री अध्यक्षस्थानी होते. शिवनेरी भुषण विनायक खोत यांचे हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वनाधिकारी अजित शिंदे, प्राचार्य दिपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदिप काळे यांचेसह ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विविध विभागातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. या प्रसंगी शिवनेरी भुषण विनायक खोत, रामेश्वर महाराज शास्त्री, अजित शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिव अजित वडगावकर यांनी केले. सूत्रसंचालन संगिता पाटील, श्रीकांत घुंडरे यांनी केले. मुख्याध्यापक प्रदिप काळे यांनी आभार मानले. शिक्षक दिनीच शिक्षकांना शालेय कामकाज बंद ठेवून लेण्याद्री व ओझर गणपती दर्शनाची पर्वणी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने उपलब्द्ध करून दिली.

Share This Article
Exit mobile version