गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्रीसाठी येणारा भेसळयुक्त गुलाल जप्त

breakingmah 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार(ब्रेकिंग महाराष्ट्र):- नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेसळयुक्त गुलालाची वाहतुक करणारे वाहन पकडून भेसळयुक्त 60 गुलालाच्या गोण्या जप्त केल्या आहे. यामधे पोलिसांनी 1120 किलो भेसळयुक्त गुलाल पकडला आहे.

 

नंदुरबार मध्ये गणेस विसर्जनाच्या पाश्वभुमीवर मोठ्या प्रमाणात गुलालाचे उधळण आणि वापर होत असतो. त्यामुळेच भेसळयुक्त गुलाल विकुन यातुन मोठे पैसे कमवणारे एक रॅकेटच कार्यरत आहे. या भेसळयुक्त गुलालमुळे गणेश भक्तांना मोठा त्रासही होतो. त्यामुळेच पोलीसांनी पहिल्यांदाच भेसळयुक्त गुलालावर केलेल्या कारवाईचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे. शहरातल्या अतिशय गजबजलेल्या हाट दरवाजा परिसरात सापा रचुन ही कारवाई करत एपे रिक्षा सह 36 हजार 550 रुपये च्या मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी रिक्षा चालक इसमाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version