भुमराळा येथे बकरीने दिला पाच पिलांना जन्म

editor 1 Min Read
1 Min Read

चिखली (एकनाथ माळेकर) – लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकर्‍याच्या बकरीने तब्बल पाच पिलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, बकरी आणि तिची पिले दोघेही सुखरूप आहेत.

भुमराळा येथील साधारण कुटुंबातील या शेतकर्‍याचा उदरनिर्वाह बकरी पालनातून चालतो. दिलीप भिवा शेळके असे त्यांचे नाव आहे. तसेच, ते अल्पभूधारक आहेत. शेती ही कोरडवाहू असल्याने त्यांना बकरी पालनातून दोन पैसे मिळतात. त्यांच्या बकरीने तब्बल पाच पिलांना जन्म देण्याचा विक्रक केला आहे. साधारणपणे बकरी दोन ते तीन पिलांना जन्म देत असते. परंतु, दिलीप शेळके यांच्या बकरीने आज, ५ सप्टेंबररोजी सकाळी ५ वाजता ५ पिलांना जन्म दिला आणी पाचही पिले आणि बकरी सुखरूप आहेत. त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. बरेच गावकरी त्या शेतकर्‍याची भेट घेऊन पहाणी करत आहे.

Share This Article
Exit mobile version