हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लोणारमध्ये ‘मी धावतो देशासाठी’ मॅरेथॉन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद यांचे आवाहन

लोणार (वाजिद खान) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लोणार शहर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘मी धावतो देशासाठी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये युवकांसह नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद आणि तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके यांनी केले आहे.

दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता जैन मिशनरी बसस्थानकासमोरून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. विनायक चौक, हिरडव चौक, इरतकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे धार चौक येथे मॅरेथॉनचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे, सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, नगराध्यक्ष सौ. मीरा भूषण मापारी, ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलीया, राजेश मापारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुरुष व महिला गटासाठी आकर्षक बक्षिसे

मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटासाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात प्रथम क्रमांकासाठी ७ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ५५५ रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी १ हजार ५५५ रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार ५५ रुपये अशी बक्षिसे आहेत. महिला गटात प्रथम क्रमांकासाठी ३ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार १५५ रुपये, तृतीय क्रमांकासाठी २ हजार ५५५ रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी १ हजार ५५५ रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार ५५ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ‘मी धावतो देशासाठी’ या उपक्रमातून युवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे लोणार शहर व तालुक्यातील युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मॅरेथॉन यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version