संत निरंकारी मंडळाच्या वतीने पोलीस वसाहत व न्यायालय परिसरात वृक्षारोपण उत्साहात

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-‘वननेस वन सेवा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश; साधसंगत, सेवादल अधिकारी व मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

चिखली (राजेंद्र घुबे) : चिखली येथील पोलीस वसाहत व न्यायालय परिसरात संत निरंकारी मंडळाच्या वतीने ‘वननेस वन सेवा–सीझन-६’ अंतर्गत २३ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

याप्रसंगी चिखली ब्रँचचे मुखी तथा बुलढाणा जिल्हा संयोजक प. आ. शालिकरामजी चवरे गुरुजी, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गाडे मॅडम, सेवादल संचालक दीपक इंगळे, सेवादल संचालिका द्वारका काळे, नगरसेवक गोकुळ शिंगणे, रुपराव इंगळे, मीडिया सहायक तथा पत्रकार विनोद चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून मानवी जीवनातील वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता याबाबत साधसंगतला मार्गदर्शन केले. वृक्ष हे केवळ निसर्गाची शोभा नसून मानवाच्या निरोगी व सुखी जीवनाचा आधार आहेत, असा संदेश यावेळी देण्यात आला. या सेवाकार्यात सर्व साधसंगत, सेवादलाचे अधिकारी, सेवादल, महात्मे व बहिणजींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान दिले. वृक्षारोपण ही केवळ सेवा नसून भावी पिढीच्या सुंदर व निरोगी भविष्याची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित या सेवाकार्यात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version