नंदुरबार जिल्ह्यात पाहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जनासाठी पोलिस दल सज्ज…

breakingmah 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यात 5 तारखेला पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन होणार असून त्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून जिल्ह्यातील विसर्जन मिरवणुकांवर ड्रोन कॅमेरा व्दारे आणि पोलीस दलाच्या गाडीवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले असून त्या व्दारे हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, गृह रक्षक दल याशिवाय एनसीसी आणि पोलीस मित्र यांची मदत घेतली जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीत पोलीस दलाच्या वतीने पोलीस मित्र आणि स्वयंसेवकांची ही मदत घेण्यात येणार आहे. तर मुस्लिम बहुल भागात मुस्लिम स्वयंसेवक पोलीस दलाला या काळात मदत करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 1200 पोलीस कर्मचारी 600 गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. सोबतच प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ही या बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.

 

Share This Article
Exit mobile version