सिंदखेडराजा येथे रोहित पवार, डॉ. शिंगणे आणि डॉ. खेडेकरांचा सोमवारी भव्य नागरी सत्कार

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

मातृतीर्थ नगरीतील नगरपरिषद प्रांगणात रंगणार सोहळा

सिंदखेड राजा (सुरेश हुसे): राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार, सिंदखेड राजाचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर या मान्यवरांचा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा उद्या, सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील नगर परिषद प्रांगणात (सावता परिषद) या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला कर्जत-जामखेडचे आमदार, माजी मंत्री तसेच नागपूर विभागीय सहकारी मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या भव्य नागरी सत्काराचे आयोजन मातृतीर्थ सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सौरभ मीराताई विजय तायडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाआघाडीसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सोहळ्याला मातृतीर्थ सिंदखेड राजा परिसरातील व मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष सौरभ तायडे आणि आयोजकांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version