लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन उत्साहात साजरा

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती; राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचे आवाहन

लोणार (वाजिद खान) : आज, २० ऑगस्ट २०२६ रोजी लोणार नगरपालिकेच्या सभागृहात लोणार शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या आयोजनातून भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भूषण मापारी होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून उपनगराध्यक्ष आबेद खान आणि गटनेते नितीन शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी लोणार नगरपालिकेचे आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, नगरसेवक अरुण जावळे, सभापती साहेबराव पवार, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक जमील कुरेशी, एजाज खान, ऐनेवार साहेब, सुचित शेटे, शेख सलीम भाई, गजानन बाजाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेख समद यांनी केले. यावेळी सद्भावना दिनाचे महत्त्व स्पष्ट करून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

Share This Article
Exit mobile version