नंदुरबार(ब्रेकिंग महाराष्ट्र):- -शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात १०१ जोडप्यांनी गणरायाची सामूहिक आरती केली. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून जागृत देवस्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात या सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता एकाच वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी एकत्र महाआरती केल्याने परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

