-सलग १९ वर्षांपासून रक्तदान शिबिराची परंपरा; रक्तदात्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरव
आळंदी (अर्जुन मेदनकर) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त स्वराज ग्रुपच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ज्ञानदर्शन धर्मशाळा, आळंदी देवाची येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल २९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराचे उद्घाटन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक व माजी तालुकाप्रमुख उत्तमदादा गोगावले, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, विद्यमान नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक सागर कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, दिनेश घुले, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, सुधीरभाऊ मुंगसे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका विनयाताई तापकीर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, अविनाश तापकीर, प्रदीप बवले, संदेश तापकीर, शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण, आनंदराव मुंगसे, रमेश गोगावले, अशोक कुऱ्हाडे, सागर भोसले, किरण येळवंडे, शशिराजे जाधव, शिरीष कारेकर, रुपालीताई पानसरे, सौरभ गव्हाणे, रोहन कुऱ्हाडे, उमेश कुऱ्हाडे, चेतन नाना कुऱ्हाडे, रविंद्र रंधवे, चारुदत्त प्रसादे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिषदादा गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अमित डफळ, मोहसिन शेख, तुषार प्रसादे, सागर कारेकर, अभिमन्यू मुंगसे, अभिजीत डफळ, ज्ञानेश्वर वाघमारे, मंगेश आरु, राज पवळे, अभिजित फदाले, सौरभ साळुंखे, सुशील कारेकर, चारुदत्त रंधवे, अनिकेत डफळ, शुभम देशमुख, श्रीपाद सुर्वे, उमेश मुंढे, अजिंक्य मुंगसे, सुरज बोराटे, मनोज पवार, अनिरुद्ध पाटील, निखिल मोजाड, समीर सलाते, सागर मेनकुदळे, निलेश वाबळे, संग्राम चव्हाण, स्वप्निल कोळी, निस्सार सय्यद तसेच स्वराज ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
स्वराज ग्रुपतर्फे सलग १९ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या शिबिरात २९१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून या सामाजिक उपक्रमाला मोठे योगदान दिले. या उपक्रमासाठी जालिंदर महाराज भोसले आणि रेड प्लस ब्लड बँकेचे पोपटराव शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अर्जुन मेदनकर, शशिकांत बाबर, गोविंद ठाकूर तौर, नितीन ननवरे आणि महादेव पाखरे यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन मनोगतातून सदिच्छा व्यक्त केल्या. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना स्वराज ग्रुपच्या वतीने विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल स्वराज ग्रुपच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.