घोटण येथील श्री मल्लिकार्जुनेश्वर सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रुपाली क्षीरसागर यांची बिनविरोध निवड

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सर्व संचालकांनी एकमताने दिली पसंती; सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी कामाची अपेक्षा

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : घोटण येथील श्री मल्लिकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुपाली संजय क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान चेअरमन कारभारी थोरात यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने सौ. रुपाली क्षीरसागर यांच्या नावाला पसंती देत त्यांची बिनविरोध निवड केली.

या निवडीत सूचक म्हणून प्रा. दादासाहेब ज्योतिक यांनी, तर अनुमोदक म्हणून श्री. लक्ष्मण टाकळकर यांनी भूमिका बजावली. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन सौ. रुपाली क्षीरसागर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण टाकळकर, केदारेश्वरचे माजी संचालक मदनदादा मोटकर, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय टाकळकर, मधुकरराव गोरे, माजी सरपंच विठ्ठलराव घुगे, मधुकर पाटील क्षीरसागर, माजी चेअरमन कारभारी थोरात, भगवानराव विघ्ने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले मेजर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भारत मोटकर, घोटणचे सरपंच सुधीर पवार, माजी उपसरपंच कुंडलिक घुगे, तुकाराम थोरवे, विष्णू घुगे, अनिल शेळके, ज्ञानेश्वर कुलट, जगधने तसेच माजी चेअरमन संजय अण्णा टाकळकर, रामजी थोरवे, दादासाहेब ज्योतिक, भाऊसाहेब मोटकर, संजय क्षीरसागर, रामजी क्षीरसागर, रमेश क्षीरसागर, राजेंद्र दौलत घुगे, पोपटराव दौंड, भारत निकम, अशोक मोटकर, मधुकर दौंड, बापूराव शेळके, बाबा गाडे, ज्ञानेश्वर लंभाटे, बबन क्षीरसागर, अमोल टाकळकर, आजिनाथ खेडकर, अशोक खेडकर मेजर, गणेश निकम यांच्यासह सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन सौ. रुपाली क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कारभाराला अधिक गतिमानता मिळून सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share This Article
Exit mobile version