रुग्णसेवेचा मराठवाड्यात सन्मान; बुलढाण्याचे डॉ. तुषार गोंधणे ‘मराठवाडा गौरव – २०२६’ने सन्मानित!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

– विधान परिषद सभापती राम शिंदे आणि मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान; त्वचारोग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल!

बुलढाणा: वैद्यकीय क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समर्पित रुग्णसेवेची दखल घेत बुलढाण्याचे सुपुत्र तसेच प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांना प्रतिष्ठित ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सोहळ्यात डॉ. गोंधणे यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यातून वैद्यकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या डॉ. गोंधणे यांनी मराठवाड्यात आपल्या वैद्यकीय सेवेचा मोठा विस्तार केला आहे. केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता, ग्रामीण व सर्वसामान्यांपर्यंत आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण त्वचारोग उपचार पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या निष्ठेमुळे आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. गोंधणे म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा एकट्याचा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा, सहकाऱ्यांचा आणि मला पाठबळ देणाऱ्या हितचिंतकांचा आहे. या पाठींब्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी असून, भविष्यात अधिक व्यापक रुग्णसेवा देण्याचा माझा प्रयत्न राहील.”

डॉ. तुषार गोंधणे यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या वैभवात भर पडली असून, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Exit mobile version