‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पुणे जिल्ह्यात ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण; १४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

पुणे (अर्जुन मेदनकर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात आले असून, आतापर्यंत ६४ हजार ६५५ लाभार्थ्यांपैकी ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप १४ हजार २०७ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित असून संबंधित शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार हवेली तालुक्यात १,३५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून १,००२ प्रकरणे प्रलंबित आहेत. भोर तालुक्यात २,३०८ पूर्ण व १,५१५ प्रलंबित, मुळशी तालुक्यात ५७३ पूर्ण व १४२ प्रलंबित, मावळ तालुक्यात १,३५२ पूर्ण व ९८५ प्रलंबित, खेड तालुक्यात २,२०८ पूर्ण व १,०९४ प्रलंबित, शिरूर तालुक्यात ४,७२९ पूर्ण व ७३० प्रलंबित, आंबेगाव तालुक्यात १,३५१ पूर्ण व २२७ प्रलंबित, इंदापूर तालुक्यात ९,२३१ पूर्ण व १,८३१ प्रलंबित, वेल्हा तालुक्यात ४२९ पूर्ण व ४०५ प्रलंबित, जुन्नर तालुक्यात २,१५५ पूर्ण व ८२५ प्रलंबित, बारामती तालुक्यात ८,५७८ पूर्ण व ९३९ प्रलंबित, पुरंदर तालुक्यात ३,१४३ पूर्ण व ७८२ प्रलंबित, तर दौंड तालुक्यात १०,६५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून १,८८३ प्रकरणे प्रलंबित आहेत. राष्ट्रीयकृत व इतर बँकांमधील २,३९७ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून १,८४७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी संबंधित बँक, सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version