– तुम्ही पिताय ती खरी ‘रम-व्हिस्की’ आहे की फक्त ‘फ्लेवर’? FSSAI च्या कारवाईने दारू बाजारात खळबळ!
– ७ वर्षे जुनी दाखवून ५% ही दारू नाही! ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या नामांकित मद्य कंपन्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : ब्रँडेड दारूच्या घोटामधून मिळणारा तोच तो ‘रॉयल’ अनुभव तुम्हाला खरोखरच मिळतोय की ती केवळ तुमची फसवणूक आहे? जर तुम्ही ओल्ड माँक किंवा रॉयल चॅलेंजचे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एफएसएसएआयने (FSSAI) प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीनंतर भारतातील अनेक अत्यंत लोकप्रिय दारूच्या ब्रँड्सवर बंदीचा बडगा उचलला आहे. नैसर्गिक प्रक्रियेऐवजी न्युट्रल अल्कोहोलमध्ये कृत्रिम फ्लेव्हर्स मिसळून ग्राहकांना कसे गंडा घातले जात होते, याचा पर्दाफाश आता झाला आहे.
FSSAI चे महत्त्वाचे निरीक्षणे:
- नाव एक, उत्पादन दुसरे: ज्या उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेव्हर्स वापरले जातात, त्यांना ‘रम’ किंवा ‘व्हिस्की’ न म्हणता ‘रम-फ्लेव्हर्ड स्पिरिट’ किंवा ‘व्हिस्की-फ्लेव्हर्ड स्पिरिट’ असे लेबल लावणे बंधनकारक आहे.
- वयाबाबत ग्राहकांची फसवणूक: ‘Old Monk XXX Rum’ च्या एका प्रकारावर ‘७ वर्षे जुनी’ (7 Years Old Blended) असा दावा करण्यात आला होता. चाचणीत निष्पन्न झाले की, यात परिपक्व रमचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी होते आणि उर्वरित भाग न्यूट्रल स्पिरिटचा होता.
- नियमांचे उल्लंघन: मद्याच्या वयाचा दावा करताना मिश्रणातील सर्वात कमी वयाच्या स्पिरिटचा विचार करणे नियमानुसार गरजेचे असते, ज्याचे येथे पूर्णपणे उल्लंघन झाले.
कोणत्या ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी?
- मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर: ओल्ड माँकचे काही प्रकार (Old Monk Variants)
- युनायटेड स्पिरिट्स: मॅकडोवेल्स नं. १ रम, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की
- इनब्रू बेव्हरेजेस: बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, ओल्ड कास्क डिलक्स XXX रम
- असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीज: सेंट्रल प्रॉव्हिन्स व्हिस्की, मॅकडोवेल्स नं. १ सेलिब्रेशन मॅच्युअर्ड XXX रम
शुद्ध आणि नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणाऱ्या मद्याऐवजी केवळ न्यूट्रल अल्कोहोलमध्ये फ्लेव्हर्स मिसळून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना FSSAI ने जोरदार दणका दिला आहे.

