भरोसा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर उबाळे

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-उपाध्यक्षपदी निकिता अमोल जाधव व राहुल हाटकर; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर उबाळे यांची, तर उपाध्यक्षपदी निकिता अमोल जाधव आणि राहुल हाटकर यांची पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ थुट्टे पाटील, डॉ. संजय जाधव, कृष्णा थुट्टे, भागवत थुट्टे, शरद थुट्टे, नाना थुट्टे, साई, संदीप गाडेकर, कैलास थुट्टे, प्रदीप थुट्टे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रिय योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version