– पुढील चार-पाच दिवसांत राज्यांत जोरदार पाऊस : हवामान खाते
पुणे (प्रतिनिधी) – पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, सोसाट्याचा वारा व वादळदेखील येणार असल्याचे सांगण्यात आल्याने नागरिक व शेतकरी यांनी सावध राहण्याची गरज आहे. सद्या विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी लागणार आहे. दोन दिवसांत मान्सून विदर्भात दाखल होईल, असे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.
पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असून, मान्सूनने आता विदर्भाकडे वाटचाल सुरु केली होती. विदर्भाच्या काही भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणात मात्र आता मान्सूनचा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. मान्सूनने सोमवारी मध्य महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापून मराठवाड्याच्या बहुतांश भागांत प्रवेश केला होता.सध्या मोसमी पावसाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सूनच्या वार्यांची प्रगती चांगली असली तरी दाखल झालेल्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भ व मराठवाड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होत आहे.
दोन दिवसांत मान्सून, विदर्भ, मराठवाड्यात

