मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-सामाजिक बांधिलकी जपत भाजपच्या आळंदी ग्रामीण व शहर मंडळाचा उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आळंदी (अर्जुन मेदनकर) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पक्षाच्या आळंदी ग्रामीण व आळंदी शहर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आळंदी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंगशेठ ठाकूर, सरचिटणीस राहुल घोलप, युवा मोर्चा अध्यक्ष उमेश थोरवे, उपाध्यक्ष प्रथमेश लेखंडे, सरचिटणीस प्रथमेश होले, माजी जिल्हा सरचिटणीस गहिनीनाथ लेखंडे, किसान मोर्चा अध्यक्ष सुरेश लेखंडे, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष देवानंद बवले, माजी सभापती कल्पना पाटीलबुवा गवारी, सोशल मीडिया अध्यक्ष कार्तिक पिंगळे, सचिव गुरुदास गवारी, कामगार आघाडी अध्यक्ष सोमनाथ वहिले, उपाध्यक्ष केतन चौधरी, बंडूबाबा पालवे, रवींद्र महाराज जोशी गुरुजी, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार, श्रीकृष्ण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तसंकलनाचे काम जीवनधारा ब्लड बँक, धानोरी यांच्या पथकाने केले. शिबिरात नागेश पोळ, संतोष राजणे, किशोर शिंदे, गणेश तरटे, संजय गायकवाड, संदीप आदिक यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपली. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आळंदी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version