उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान व्हावेत – आमदार सिद्धार्थ खरात

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वाढदिवसानिमित्त बालाजी मंदिरात साकडे, कमळजा मातेला प्रार्थना, वृक्षारोपण, शालेय साहित्य व फळांचे वाटप; मेहकर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. २७) मेहकर विधानसभा मतदारसंघात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बालाजी मंदिरात विशेष प्रार्थना, लोणार येथील कमळजा मातेला साकडे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथील बालाजी मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर लोणार येथील कमळजा माता मंदिरात गळ्यापर्यंत पाण्यातून जाऊन पक्षप्रमुखांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर मेहकर येथील पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच मेहकर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून शैक्षणिक उपक्रमालाही प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे तसेच भविष्यात देशाचे नेतृत्व करून पंतप्रधानपदाची धुरा सांभाळावी, अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी दिनकर खरात, तहसीलदार निलेश मडके, विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, नगरसेवक नितीन तुपे, महेश रिंढे, प्रा. सतीश ताजने, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, तेजराव घायाळ, गजानन खरात, ॲड. आकाश घोडे, छोटूभाई गवळी, ॲड. संदीप गवई, महिला आघाडी तालुकाप्रमुख स्वाती नवले, संदीप गारोळे, नंदकिशोर देशमुख, शेषराव बदर, पवन टाले, शालिनी मोरे, अमोल बोरे, वैभव कायंदे, साहेबराव हिवाळे, भागवत बोरकर, उमेश चनखोरे, दीपक गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version