जानकीदेवी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-परीक्षेला बसलेले सर्व १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

चिखली (राजेंद्र घुबे)  : नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती पात्रता परीक्षेच्या निकालात जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातून परीक्षेला बसलेले सर्व १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध आणि दर्जेदार तयारी करून घेतली होती. त्याचेच फलित म्हणून परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, माजी प्राचार्य हरिदासजी घुबे, विद्यमान प्राचार्य बबनराव लांडगे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, पुढील शैक्षणिक वाटचालीतही असेच यश संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्ये आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Exit mobile version