भरोसा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर उत्साहात संपन्न

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसह सुमारे ३५० नागरिकांनी घेतला लाभ

चिखली (राजेंद्र घुबे) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच बुलढाणा जिल्ह्याचे ‘जलपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या जयंती पंधरवड्याचे औचित्य साधून चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील भरोसा येथील हनुमान मंदिर सभामंडपात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादा पवार आणि स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. त्यानंतर गावातील नागरिक तसेच स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी उपस्थित ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले.

कार्यक्रमाला चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोषभाऊ परीहार, युवा तालुकाध्यक्ष रुपेश रिंढे, संतोष आटोळे, आसिफभाई, विलास गाडेकर, पत्रकार राजेंद्र घुबे, गजानन घुबे तसेच गावातील विठ्ठल थुट्टे, राजू आण्णा थुट्टे, बाजार समिती सदस्य गणेश थुट्टे, दत्तू थुट्टे, शरद थुट्टे, संदीप पाटील थुट्टे, अमोल पाटील थुट्टे, शुभम थुट्टे, सौरव भुसारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेळगाव आटोळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वायाळ यांच्या मार्गदर्शनाखालील वैद्यकीय पथकाने गावातील सुमारे ३५० नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे व गोळ्यांचे मोफत वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील थुट्टे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक विशाल थुट्टे यांनी केले.

Share This Article
Exit mobile version