चिखली–देऊळगाव राजा मार्गावर दोन दुचाकींची भीषण समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-मेरा चौकीजवळ दुपारच्या सुमारास अपघात; पोलिसांकडून तपास सुरू

चिखली (अंकुश पाटील) : चिखली–देऊळगाव राजा महामार्गावरील मेरा चौकी परिसरात आज दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच २८ एम ६९३३ क्रमांकाच्या टीव्हीएस व्हेक्टर दुचाकीची एमएच २८ … ५०३० क्रमांकाच्या दुसऱ्या दुचाकीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात रोहन माळेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Exit mobile version