-सिंदखेडराजात आढावा बैठक; उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे कामाचा वेग वाढविण्याचे स्पष्ट निर्देश, मतदारांना बीएलओंशी संपर्क साधण्याचे आवाहन
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या ऑनलाइन डिजिटायझेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (BLO) आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कामाचा वेग वाढविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
मतदारांना सहकार्याचे आवाहन
मतदार यादीचे पुनरीक्षण अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या भागातील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. मतदार यादीसाठी आवश्यक असलेली अचूक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

